
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai) सेंट्रल रेल्वे महिला कल्याण संस्था(CRWWO) ने 14 नोव्हेंबर 2022 रोजी बालदिनानिमित्त रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांना पारितोषिकांचे वितरण केले. यापूर्वी, 11 आणि 18 सप्टेंबर 2022 रोजी रेखाचित्र, चित्रकला(drawing) आणि निबंधलेखन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. एकूण 735 वयोगटातील(6-15) मुलांनी संपूर्ण झोनमध्ये भाग घेतला आणि त्यांचे लेखन आणि चित्रकला कौशल्ये प्रदर्शित केली. त्यापैकी ६० बालकांना डॉ. मेनू लाहोटी(अध्यक्ष, CRWWO) यांच्याहस्ते निर्मल पार्क येथे 14 नोव्हेंबर रोजी पारितोषिक वितरण करण्यात आले.
मास्टर पृथ्वी भीमशा(सोलापूर विभाग), सेंट्रल रेल्वे मुख्यालयातील कुमारी अम्वी प्रिया आणि पुणे विभागातील कुमारी तहरीन फलक यांना रेल्वे बोर्ड स्तरावर सांत्वन पारितोषिके देण्यात आली.
मेनू लाहोटी(अध्यक्ष), उपाध्यक्षा निती सिंग यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सचिव नीरू अरोरा, दिव्या शर्मा कोषाध्यक्ष आणि CRWWO चे इतर कार्यकारी सदस्य, समाजाच्या कल्याणासाठी विशेषत: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात.