
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ ही बुधवारी मध्य प्रदेशात प्रवेश करणार आहे. यावेळी प्रियंका गांधी—वाड्रा(Priyanka Gandhi-Vadra) या यात्रेत सहभागी होणार आहेत. त्या पहिल्यांदाच या यात्रेत सहभागी होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत जोडो यात्रा ही 23 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात(Madhya Pradesh) पोहचेल आणि 24 नोव्हेंबर रोजी प्रियंका गांधी या यात्रेत सहभागी होतील. ही यात्रा मध्य प्रदेशातील सुमारे 5 जिल्हांतून जाणार आहे.