India Ground Report

Mumbai : नौदलाच्या खलाशाची जहाजावर आत्महत्या; चौकशीचे दिले आदेश

Mumbai: Navy sailor commits suicide on board; Inquiry ordered

मुंबई : (Mumbai) मुंबई बंदरात एका 25 वर्षीय भारतीय नौदलाच्या खलाशाने(Indian Navy sailor) आपल्या सर्व्हिस रायफलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एका अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, नौदलाच्या युद्धनौकेवर ही घटना शनिवारी दुपारी घडली असून, नौदलाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

अधिका-याने सांगितले की, खलाशी जहाजावरील एका खोलीत गेला आणि कथितपणे स्वत:वर गोळी झाडली. अधिकाऱ्याने सांगितले की, आत्महत्येमागील(suicide) नेमके कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु काही घरगुती कारणांमुळे खलाशाने हे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नौदलाच्या प्रवक्त्याशी(Navy spokesperson) संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Exit mobile version