
मुकुंद लांडगे
मुंबई : (MUMBAI) मुंबईत सध्या मुलांमधील गोवर आजाराने डोके वर काढले आहे. त्या पार्श्वूमीवर राज्य सरकारने उपाययोजनांबाबत निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या चेंबूर एम-पश्चिम विभागातील अधिकाऱ्यांनी लहान मुले, तसेच नागरिकांची आरोग्य तपासणी(health check-up) करून औषधे देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
चेंबूर नाका(Chembur Naka) येथील आरोग्यकेंद्राच्या वतीने सिध्दार्थ कॉलनीतील सुभेदार मालोजी सभागृहात ही आरोग्य तपासणी करण्यात आली. समाज विकास अधिकारी राजेंद्र सकट, डॉ. अभिषेक साजण, माधवी शेलार, भूषणा धुमाळ, रोहिणी भोये, निकिता हमरे, संपदा पाटील, अनिता कांबळे यांनी यावेळी पालक आणि नागरिकांना मार्गदर्शन केले, तर या कार्यक्रमाला वंचितच्या मुंबई महिला आघाडी अध्यक्षा सुनिता गायकवाड, तसेच आंनद जाधव उपस्थित होते, अशी माहिती हरीश काशिद यांनी दिली.
दरम्यान, यावेळी माधवी शेलार यांनी नागरिकांना आवाहन करीत लहान मुलांवर पालकांनी लक्ष ठेवावे असे सांगितले. चार वर्षांपूर्वी २०१८ मध्ये गोवर या आजारावर लस आली होती. ती १ली ते १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत असतानाही अनेक नागरिकांनी यासाठी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे ‘गोवर’ हा आजार आता कोरोनासारखा(Corona) झपाट्याने वाढतांना दिसत आहे, असेही त्या म्हणाल्या. तर, यावेळी अनेक मान्यवरांनी या आजाराची लक्षणे सांगितली.
या कार्यक्रमाचे आयोजक गणेश गवारे, संदीप गवारे, महेश जाधव, संतोष खरात, विनोद पगारे होते, असे निमंत्रक दिलीप लोखंडे यांनी सांगितले.