India Ground Report

Mumbai : पुढील महिन्यात म्हाडाच्या मुंबई, कोकण व पुणे मंडळाची 9 हजार घरांची लॉटरी

दीपक पवार
मुंबई : म्हाडाच्या मुंबई(Mumbai), कोकण आणि पुणे मंडळाची लॉटरी फार लांबणीवर पडली. यावेळी म्हाडाने आधुनिक आणि नव्या बदलाची पेन फ्री पद्धतीने लॉटरी असावी म्हणून नवीन संगणकीय प्रणाली(सॉफ्टवेअर) तयार करण्याचे काम सुरु होते. त्यामुळे ही लॉटरी अनेक महिने लांबणीवर पडली होती. मात्र, आता नवीन संगणकीय प्रणाली(सॉफ्टवेअर) तयार झाले असून, डिसेंबर आणि मार्च महिन्यात तब्बल ९ हजारांची लॉटरी काढण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

म्हाडाच्या(MHADA) मुंबई, कोकण आणि पुणे मंडळाची घरे गेली अनेक महिन्यांपासून तयार होती. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना अनेक अटी आणि अडचणींना सामोरे जावे लागते. नागरिकांचा त्रास कमी व्हावा, सोप्या पद्धतीने अर्ज भरता यावा आणि घरांची ताबा प्रक्रिया जलद व्हावी, असे अनेक नवीन बदल म्हाडाने करायला घेतले होते. नवीन संगणकीय प्रणाली(सॉफ्टवेअर) तयार करण्यास घेल्याने लॉटरी लांबली होती. मात्र, आता हे काम पूर्ण झाले असल्याने म्हाडाने ९ हजार घरांच्या लॉटरीची तय्यारी केली आहे. कोकण मंडळाच्या ४ हजार घरांची आणि पुणे मंडळाची ३ हजार ८०० घरांच्या लॉटरीची जाहिरात डिसेंबर महिन्यात निघणार आहे, तर मुंबई मंडळाच्या २ हजार ६०० घरांची लॉटरी मार्चमध्ये होणार आहे. या लोटीरीची तयारी म्हाडास्तरावर सुरु असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

म्हाडाकडून नव्या लॉटरी प्रक्रियेसाठी(lottery process) नवीन संगणकीय प्रणाली(सॉफ्टवेअर) तयार केली आहे. यापुढे इच्छुकांना अर्ज भरतानाच आवश्यक सर्व कागदपत्रे ऑनलाईन सादर करावी लागणार आहेत. अर्जदारांना सोप्या पद्धतीने अर्ज भरता यावा यादृष्टीने या प्रणालीची रचना करण्यात आली असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. नोंदणी अर्ज भरताना इच्छुकांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, निवासाचा दाखला ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. यामुळे लॉटरीआधीच अर्जदारांची पात्रता पूर्ण होणार आहे. ही संगणकीय प्रणाली अर्जदारांना पेन फ्री असणार आहे. यासाठी म्हाडाने एक ऍप(app) सुध्दा बनविले आहे. लॉटरी विजेते ठरल्यानंतर पुढे थेट देकार पत्र देऊन विजेत्यांकडून घराची रक्कम भरून घेतली जाणार आहे. लॉटरीमध्ये घर लागल्यानंतर विजेता म्हाडाच्या सर्वच मंडळाच्या लॉटरी प्रकियेतून बाद होणार आहे. पुन्हा कोणत्याही लॉटरी प्रक्रियेत त्यास अर्ज करता येणार नसल्याचे सॉफ्टवेअर म्हाडाने तयार केले आहे.

Exit mobile version