India Ground Report

Mumbai : धुक्यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनस – हरिद्वार वातानुकूलित द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस रद्द

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : वर्ष २०२२-२३ च्या धुक्यामुळे पुढे नमूद केलेल्या कालावधीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस – हरिद्वार द्वि-साप्ताहिक एसी एक्सप्रेस रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

12171 लोकमान्य टिळक टर्मिनस हरिद्वार वातानुकूलित एक्सप्रेस दि. १ डिसेंबर २०२२ ते २७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत प्रवासासाठी बंद राहील.

12172 हरिद्वार – लोकमान्य टिळक टर्मिनस हरिद्वार वातानुकूलित एक्सप्रेस दि. २ डिसेंबर २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत प्रवासासाठी बंद राहील.

प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी, अशी विनंती रेल्वेकडून करण्यात आली आहे.

Exit mobile version