India Ground Report

Mumbai : ‘त्या’ विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : रेल्वेने(Railway) प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस – कानपूर आणि पुणे – वीरांगणा लक्ष्मीबाई जंक्शन दरम्यान चालणाऱ्या विशेष गाड्यांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

लोकमान्य टिळक टर्मिनस – कानपूर सुपरफास्ट स्पेशल
04152 सुपरफास्ट स्पेशल दि. ३ डिसेंबर २०२२ ते १ एप्रिल २०२३ (१८ फेऱ्या) पर्यंत दर शनिवारी चालविण्यासाठी विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

04151 सुपरफास्ट स्पेशल दि. २ डिसेंबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ (१८ फेऱ्या) दर शुक्रवारी चालविण्यासाठी विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

04151/04152 विशेष ट्रेनच्या(special trains) वेळा, संरचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल नाही.

पुणे – वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन स्पेशल ट्रेन

01921 स्पेशल दि. १७ नोव्हेंबर २०२२ ते ३० मार्च २०२२ (२० फेऱ्या) दर गुरुवारी चालविण्यासाठी विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

01922 स्पेशल दि. १६ नोव्हेंबर २०२२ ते २९ मार्च २०२३ (२० फेऱ्या) दर बुधवारी चालविण्यासाठी विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सुधारित संरचना – एक द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ५ शयनयान, ६ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये २ गार्डच्या ब्रेक व्हॅन.

01921/01922 विशेष ट्रेनच्या वेळेत आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल नाही.

आरक्षण : विशेष ट्रेन क्रमांक 04152 आणि 01921 च्या विस्तारित फेऱ्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्यावी किंवा NTES ॲप डाउनलोड करावे.

प्रवाशांना(Passengers) स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोव्हिड संबंधित योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

Exit mobile version