India Ground Report

Mumbai : अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून 157 कोटींची मदत जाहीर

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मंत्रालयाशेजारील समुद्रात जलसमाधी आंदोलन करणार असून, यासाठी ते मुंबईला रवाना झाले आहेत. तर, दुसरीकडे सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना(Farmers) मदत जाहीर केली. दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 157 कोटींची मदत सरकारने जाहीर केली आहे.

या दोन जिल्ह्यातील(districts) शेतकऱ्यांना जिरायत पिकांसाठी 13600 रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकांसाठी 27000 रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी 36000 रुपये प्रति हेक्टर मदत सरकारने जाहीर केली आहे.

राज्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कापूस-सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही, असा आरोप शेतकरी नेते रवीकांत तुपकर यांनी केला आहे.

त्याचबरोबर सोयाबीन आणि कापसाला(cotton) भाव नाही. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना रात्रीची नव्हे तर दिवसाची लाईट पाहिजे, अशा अनेक मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना एक महिन्यांपासून आंदोलन करीत आहे. मात्र, सरकार याची कोणतीही दखल घेत नाही, असा आरोप देखील रवीकांत तुपकर यांच्याकडून करण्यात आला आहे.

Exit mobile version