
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : मुंबईत विमानतळावर कस्टम विभागाने(Customs department) मोठी कारवाई केली आहे. कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर ३२ कोटी किमतीचे ६१ किलो वजनाचे सोने जप्त केले आहे. याप्रकरणी ७ जणांना अटक केली आहे. या आरोपींमध्ये २ महिलांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ भारतीय प्रवासी टांझानिया(Tanzania) देशातून आले होते. या प्रवाशांनी सोने लपविले होते. या चौघांकडे २८. १७ कोटी किमतीचे ५३ किलो सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. टांझानियातून येताना दोहा विमानतळावर सुडानी नागरिकाने एका कंबरेचा पट्टा दिला. त्यांची विचारपूस केल्यावर चौघे प्रवासी टांझानियातून आल्याचे कळले.
या चार प्रवाशांनी शरीराला चारी बाजूने सोन्याची बिस्किटे गुंडाळली होती. या चौघांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी कबूल केले की, त्यांना अनोळखी सुडानी नागरिकाने दोहा विमानतळावर(Doha airport) सोन्याची बिस्किटे दिली. दरम्यान, या सुडानी नागरिकाने त्यांच्यासोबत प्रवास केला नाही. या चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने या चौघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.