India Ground Report

Mumbai : सेंट्रल रेल्वेने साजरा केला ‘जनजाती गौरव दिवस’

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : सेंट्रल रेल्वेने(Central Railway) 15 नोव्हेंबर 2022 रोजी मुख्यालय आणि सर्व 5 विभागांमध्ये ‘जनजाती गौरव दिवस’ साजरा केला. धरती आबा भगवान बिरसा मुंडा हे एक प्रतिष्ठित स्वातंत्र्य आणि आदिवासी नेते यांची जयंती साजरी करण्यात आली.

यानिमित्ताने सेन्ट्रल रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागात प्रश्नमंजुषा, निबंध आणि चित्रकला स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, सायकल रॅली(cycle rallies) आणि इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्थानके, रेल्वे वसाहती, कार्यशाळा आणि रेल्वे परिसरात पोस्टर्स आणि बॅनर लावण्यात आले. सर्व स्थानकांवर सार्वजनिक घोषणा प्रणालीवर जिंगल्स वाजविण्यात आल्या.

ट्विटर(Twitter), फेसबूक, कू, इन्स्टाग्राम इत्यादी माध्यमातून विविध सोशल मीडिया मोहिमेद्वारे जनजाती गौरव दिनाच्या संदेशाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्यात आला.

राष्ट्राच्या इतिहास आणि संस्कृतीत(history and culture) आदिवासी समुदायाच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी जनजाती गौरव दिवस साजरा केला जातो.

Exit mobile version