
26 आणि 27 नोव्हेंबर रोजी 180 जण जाणार गुवाहाटीला
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai) राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले आमदार, खासदारांच्या कुटुंबियांसह कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. हे सर्व येत्या २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला जाणार आहेत. गुवाहटीला जाण्यासाठी शिंदे गटाकडून एअर इंडियाचे विशेष विमान बुक करण्यात आले आहे.
शिंदे गटाचा गुवाहाटी दौरा निश्चित झाल्यानंतर आता यासाठी विशेष विमान बुक केल्याची माहिती समोर आली आहे. दौऱ्यातील आमदार, खासदार आणि त्यांचे कुटुंबीय असे 180 जणांसाठी विशेष विमान बुक करण्यात आले आहे.
राज्याच्या राजकारणात आणि शिवसेना पक्षातून उठाव करून एकनाथ शिंदे आणि 40 आमदार बाहेर पडले, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या या उठावानंतर काही शिवसेना आमदार गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी तिथे त्यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. आता पुन्हा एकदा 27 नोव्हेंबरला सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार, खासदार आणि त्यांचे कुटुंबीय कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नेत्यांकडून सांगितले जात आहे की, आम्ही सगळ्यांनी कामाख्या देवीला नवस केला होता. तो नवस या दौऱ्यात फेडणार आहोत.