India Ground Report

Mumbai : महाराष्ट्रातील गावागावात साजरी झाली बिरसा मुंडा जयंती

किसान सभेच्यावतीने करण्यात आले लाल झेंड्याचे ध्वजारोहण

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : महान आदिवासी शेतकरी स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा बिरसा मुंडा(Birsa Munda) यांच्या जयंती दिनी किसान सभेच्या वतीने देशभर ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. महाराष्ट्रातील गावागावात मंगलवारी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने लाल झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. यात मोठ्या संख्येने शेतमजूर, शेतकरी,आदिवासी व कामगार सहभागी झाले होते.

किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे आणि राष्ट्रीय कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी शहीद बिरसा मुंडा यांना अभिवादन करून लाल झेंडा फडकविला. महाराष्ट्रातील तळोदा, नंदूरबार, धुळे, जळगाव, दिंडोरी, नाशिक, येवला, वर्धा, अमरावती, सांगली, सातारा, बीड, मराठवाडा या सर्व ठिकाणी शेतकरी, शेतमजूर, कामगार यांनी अभिवादन केले.

किनवट(Kinwat) तालुक्यातील सहस्ञकुंड शिवणी, कुपटी, पिंपरफोडी गावी सकाळी ७ वाजता किसान सभेचा कार्यकर्ते यांनी झेंडा फडकवून बिरसा मुंडाना अभिवादन करण्यात केले. वाडा तालुक्यातील आबिटघर विभागातील खैरे आंबिवली युनिटमध्ये झेंडावंदन करण्यात आले. त्यावेळी कॉ. प्रकाश चौधरी जिल्हा कमिटी सदस्य उपस्थित होते. शेतकरी नेते काॅ. अर्जुन आडे यांनी किनवट येथे आंदोलनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. माजलगाव पार्टी ऑफिस येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव जेष्ठ नेते कॉम्रेड बाबा आणि माहुली सातारा येथे बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

मूलभूत हक्कासाठी संघर्ष करणे हाच खरा बिरसा मुंडा यांचा जयजयकार होय, असा सूर राजूर येथे बिरसा मुंडा जयंती वक्त्यांकडून करण्यात आला. कॉ. कुमार मोहरमपुरी, लीलाधर आरमोरीकर, पो. पा. सरोज मून, कॉ. नंदकिशोर लोहकरे, सतपाल गाडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्वप्रथम जनाबाई सुरपाम, प्रेमीला आत्राम, ताराबाई मडकाम, वंदना उईके, छाया पेंदोर व उपस्थित महिलांच्याहस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर(Shahapur) तालुक्यातील शिकवली, राजपूरी आणि जांभळं पाडा सावरदेव याठिकाणी झेंडा फडकवून अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांचे आवाहन

बिरसा मुंडा यांनी भारताची जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी आणि परकियांचे आक्रमण व पारतंत्र्य रोखण्यासाठी अभूतपूर्व संघर्ष केला. आज जेव्हा पुन्हा एकदा कॉर्पोरेट कंपन्या व कॉर्पोरेटधार्जिणे भाजप सरकार आदिवासींच्या जगण्याच्या अधिकारांवर आक्रमण करीत राष्ट्राची संपत्ती असलेले जल, जंगल, जमीन ओरबाडत आहे व आदिवासींना ते कसत असलेल्या जमिनींवर मालकी नाकारून त्यांना जंगलातून बेदखल केले जात आहे. अशा परिस्थितीत बिरसा मुंडा यांचा आदर्श समोर ठेवत पुन्हा संघर्ष करण्यासाठी सज्ज रहा, असे आव्हान किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे(Dr. Ashok Dhavale) यांनी करून झेंड्याचे ध्वजारोहण केले.

Exit mobile version