India Ground Report

Mumbai : कांजूरमार्ग येथे कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

Mumbai: A dead body was found in Kanjurmarg in a decomposed state

मुकुंद लांडगे
मुंबई : (Mumbai)
कांजूरमार्ग(Kanjurmarg) पूर्वेकडील हायवेलगत असलेल्या सर्व्हिस रोडच्या बाजूला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे. तो एका पुरुषाचा असून, येथील गवताळ भागात सांगाडा स्वरूपात पोलिसांना आढळला असल्याचे सांगण्यात आले.

कांजूरमार्ग पोलिसांना १५ नोव्हेंबर रोजी पोलिसांच्या पूर्व प्रादेशिक विभागातील नियंत्रण कक्षातून एक मेसेज आला होता. त्यात येथील जॉली ब्रदर्सच्या लँडमध्ये एका नाल्याजवळ कुजलेला सांगाडा असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार, कांजूरमार्ग पोलीस ठाण्यातील अधिकारी सकपाळ आणि ठाणे अंमलदार महिला उपनिरीक्षक शिंदे यांचे पथक येथील प्लॉट क्रमांक-६५७, अदी अलोरा सोसायटीच्या मागील बाजूला गेले. त्यावेळी हा सांगाडा कपड्यात होता. कमरेला काळा आणि लालसर धागा आढळून आला. हा मृतदेह जेजे रुग्णालयात(JJ Hospital) पाठविण्यात आला असून, पोलीस या मृतदेहाची ओळख पटवत आहेत. याप्रकरणी कांजूरमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इकबाल अवळकर हे पुढील तपास करीत आहेत.

Exit mobile version