
West Bengal : ममता बॅनर्जी यांचा भाजपवर हल्लाबोल

‘भाजप २०२४ मध्ये सत्तेत येणार नाही हे निश्चित’
Indiagroundreport वार्ताहर
कोलकाता : (Kolkata) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) यांनी आज पुन्हा भाजपवर हल्लाबोल केला. भाजप २०२४ मध्ये सत्तेत येणार नाही हे निश्चित आहे, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपकडे काही काम नाही. तीन-चार एजन्सींच्या माध्यमातून राज्य सरकार आपल्या ताब्यात घेणे एवढेच त्यांचे काम आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
पश्चिम बंगाल त्यांचा पराभव करेल
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, त्यांनी महाराष्ट्रावर(Maharashtra) कब्जा केला, आता झारखंड ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पश्चिम बंगाल त्यांचा पराभव करेल. बंगालला तोडणे त्यांना शक्य नाही, कारण याठिकाणी त्यांना आधी रॉयल बंगाल टायगरशी लढावे लागेल.
भारतात ४० टक्के बेरोजगारी वाढली
भाजप २०२४ मध्ये सत्तेत येणार नाही, असा मला विश्वास आहे. भारतात ४० टक्के बेरोजगारी(unemployment) वाढत आहे, मात्र पश्चिम बंगालमध्ये ४५ टक्के कमी झाली आहे. आजच्या घडीला मीडिया ट्रायल सुरू आहे आणि ते लोकांनाच आरोपी करीत आहेत. ते पश्चिम बंगालची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.