
Visakhapatnam : विषारी वायूगळतीमुळे शंभरहून अधिक कर्मचारी रुग्णालयात दाखल

Indiagroundreport वार्ताहर
विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील(Andhra Pradesh) औद्योगिक क्षेत्रात पुन्हा एका मोठ्या प्रमाणात वायूगळती झाली आहे, त्यामुळे आतापर्यंत सव्वाशेच्या आसपास नागरिकांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणमजवळ ही वायूगळतीची दुर्घटना मंगळवारी सव्वासहा ते सात वाजताच्या दरम्यान घडली. ही कंपनी अनकपल्ली जिल्ह्यातील अच्युतपुरम परिसरात आहे. दुपारी २ ते रात्री १० या शिफ्टमध्ये जवळपास हजार कर्मचारी ड्युटीवर होते. सुरुवातीला उलटीचा त्रास झालेल्या ५० महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता हीच संख्या वाढून सव्वाशेच्या आसपास झाली आहे. उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
गॅस गळतीनंतर(gas leak) कर्मचाऱ्यांमध्ये घबराट उडाली. गॅस गळतीमुळे बाधा झाल्याने काही कर्मचाऱ्यांना उलटीचा त्रास सुरू झाला, त्यानंतर त्यांना स्पेशल इकॉनॉमिक झोनमधील मेडिकल सेंटरमध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले.
गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीतील ही गॅस गळतीची दुसरी दुर्घटना आहे. राज्याचे मंत्री(State Minister) अमरनाथ यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कंपनी बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.