
Thane: कोणत्या रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सेसची कमतरता?

एक नर्स 50 रुग्णांची करते तपासणी
समर प्रताप सिंग
ठाणे : (thane) ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वार्डमधील डॉक्टरांची व नर्सेसची(nurses) कमतरता अनेक दिवसांपासून याठिकाणी असून, एक नर्स 50 रुग्णांची तपासणी करते.
स्टाफ व कामगार यांनी युनियनकडे धाव घेतली
त्यात रुग्णालयातील इतर समस्या निकाली लागत नाहीत, वेतनात वाढ होत नाही, स्टाफ कमी असल्यामुळे उपस्थित स्टाफवर कामाचा बोझा वाढतो(the workload), तसेच नर्सेसना पगार कमी असल्यामुळे येथे कोणी नोकरीसाठी येत नाही, यासाठी रुग्णालयातील नर्स, स्टाफ व कामगार यांनी युनियनकडे धाव घेतली. त्याप्रमाणे धर्मवीर आरोग्य कामगार सेना युनियन अध्यक्ष योगेश बोरसे, सचिव विजय शिंदे, उपाध्यक्ष मनोज परब, कार्यालय प्रमुख अशोक बनसोडे यांनी अनेक महिने वारंवार संबंधित अधिकाऱ्यांसोबत भेट घेऊन याविषयी चर्चा केली, मात्र तोडगा न निघाल्याने आज युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधीक्षक (डीन) भीमराव जाधव आणि डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांची भेट घेऊन त्याच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला.

तोडगा काढणार असल्याचे आश्वासन
यावेळी सर्व बैठक झाल्यानंतर मुख्य अधीक्षक भीमराव जाधव(Bhimrao Jadhav) यांनी सकारात्मक भूमिका मांडत या प्रश्नांवर येत्या महिन्याभरात तोडगा काढणार असल्याचे आश्वासन कामगारांना आणि युनियन पदाधिकाऱ्यांना दिले आहे. पुढील महिन्याभरात या कामगारांच्या समस्यांचे समाधान न झाल्यास युनियन पद्धतीने उत्तर देण्याचा इशारा युनियन पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.