
Thane: कोणत्या विद्युत डीपीला लागली आग ?

समर प्रताप सिंग
ठाणे : (thane) ठाणे परिसरातील मुंबई मराठी ग्रंथ संग्रालयाजवळील ठाणे मार्केट परिसरातील विद्युत डीपीला गुरुवारी दुपारी १:३० वाजता आग लागली. यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही, आगीवर(fire) नियंत्रण मिळविण्यात आले.
गुरुवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास मराठी ग्रंथ संग्रहालयाजवळ, ठाणे मार्केट, ठाणे (प.) येथे महावितरणच्या डीपीमधील इलेक्ट्रिक केबलला(electric cable) किरकोळ आग लागली होती. सदर घटनास्थळी महावितरण कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान १-फायर वाहनासह उपस्थित होते.

महावितरण(MSEDCL) कर्मचाऱ्यांनी प्रसंगवधानाने विद्युतपुरवठा खंडित केला होता. आगीवर नियंत्रण मिळविल्याने दुर्दैवी प्रकार टळला. आग लागण्याचे निश्चित कारण समजू शकले नाही.