
Thane : ठाण्यात शिवसेनेचे दोन गट

राजा आदाटे
ठाणे : (Thane) राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेत उभी फुट पडण्याची शक्यता वर्तविली असतानाच, गुरुवारी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांनाच समर्थन असल्याचे जाहीर केले. याशिवाय, ठाणे शहरभर शिंदे समर्थनाचे मोठे फलक लागले असून, असेच काहीसे चित्र जिल्ह्याच्या इतर शहरांमध्ये आहे. यामुळे जिल्ह्यात शिंदे समर्थकांच्या शक्तिप्रदर्शनाला सुरुवात झाल्याचे चित्र आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे आमदार
1) एकनाथ शिंदे, 2) अनिल बाबर, 3) शंभूराजे देसाई, 4) महेश शिंदे, 5) शहाजी पाटील, 6) महेंद्र थोरवे, 7) भरतशेठ गोगावले, 8) महेंद्र दळवी, 9) प्रकाश अबिटकर, 10) डॉ. बालाजी किणीकर, 11) ज्ञानराज चौगुले, 12) प्रा. रमेश बोरनारे, 13) तानाजी सावंत, 14) संदीपान भुमरे, 15) अब्दुल सत्तार नबी, 16) प्रकाश सुर्वे, 17) बालाजी कल्याणकर, 18) संजय शिरसाट, 19) संजय रायमुलकर, 20) संजय गायकवाड, 21) विश्वनाथ भोईर, 22) शांताराम मोरे, 23) श्रीनिवास वनगा, 24) किशोरअप्पा पाटील, 25) सुहास कांदे, 26) चिमणआबा पाटील, 27) लता सोनावणे, 28) प्रताप सरनाईक, 29) यामिनी जाधव, 30) योगेश कदम, 31) गुलाबराव पाटील, 32) मंगेश कुडाळकर, 33) सदा सरवणकर, 34) दादा भुसे.
अपक्ष आमदार
1) बच्चू कडू, 2) राजकुमार पटेल, 3) राजेंद्र यड्रावकर, 4) चंद्रकांत पाटील, 5) नरेंद्र भोंडेकर, 6) किशोर जोरगेवार, 7) मंजुळा गावित, 8) विनोद अग्रवाल, 9) गीता जैन.