
Thane: ठाण्यात आजपासून भरणार नॅशनल गेम्सच्या स्विमिंग ट्रायल

स्पर्धकांना प्रो्त्साहन देण्यासाठी ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे
समर प्रताप सिंग
ठाणे: (Thane) स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या(Swimming Federation of India) मान्यतेने व महाराष्ट्र स्विमिंग ट्रायल कमिटी नियोजनाने ३६ व्या नॅशनल गेम्स व ७५ व्या सिनीयर नॅशनल चॅम्पीयनशीपसाठी पाठवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र स्विमिंग , वॉटरपोलो , डायव्हिंग संघाची निवड चाचणीस दि. ६ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट रोजी दि ठाणे क्लब, तीन हात नाका, ठाणे येथे आयोजित करण्यात आली आहे. या नॅशनल गेम्सच्या स्विमिंग ट्रायलचे उद्घाटन उद्या 6 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.00 वा. होणार आहे.
या कार्यक्रमास आमदार ॲङ निरंजन डावखरे उपस्थित राहणार आहेत.
सदर निवड चाचणी यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटना , दि ठाणे क्लब व स्टारफिश स्पोर्टस फाउंडेशन यांनी पुढाकार घेतला आहे . या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी ठाणेकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे करण्यात आले आहे.