
Thane : शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुखपदी केदार दिघे यांची नियुक्ती

Indiagroundreport वार्ताहर
ठाणे : ठाणे जिल्हा प्रमुखपदी केदार दिघे(Kedar Dighe) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अनिता बिर्जे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदीप शिंदे यांच्यावर ठाणे शहर प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, चिंतामणी कारखानीस यांची ठाणे विभागीय प्रवक्ते पदावर नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.