spot_img
Homecrime-mrThane : हरवलेल्या महिला व मुलांचा शोध

Thane : हरवलेल्या महिला व मुलांचा शोध

समर प्रताप सिंग
ठाणे : ठाणे(Thane) येथील प्रमिला कडेशंकर सरोज(वय – 34 वर्षे, रा. शंकर मंदिर सत्यम एंटरप्रायजेस, छोट्या साईमंदिरसमोर, मनोरमानगर, ठाणे प.) ही महिला, मुलगा कु. गुलशन सरोज(वय 12 वर्षे) व कु. साहिल सरोज (वय 10 वर्षे) हे दोन मुलं हरवल्याची नोंद कापूरबावडी पोलीस स्टेशन, ठाणे येथे झाली आहे.

हरवलेल्या महिलेचे वर्णन : अंगाने बारीक, रंग – गोरा, चेहरा – गोल, डोळे – काळे, डोक्याचे केस – काळे लांब, उंची – 5 फूट 2 इंच, नाक – सरळ, अंगात हिरव्या रंगाचा टॉप, निळ्या रंगाचा पायजमा व पांढऱ्या रंगाची ओढणी घातलेली आहे.

हरवलेल्या मुलांचे वर्णन : गुलशन सरोज अंगाने मध्यम, रंग – सावळा, चेहरा – गोल, डोळे – काळे, डोक्याचे केस – काळे बारीक, उंची – 3 फूट 5 इंच, नाक – सरळ, अंगात लाल रंगाचा टी-शर्ट व हिरव्या रंगाची हाप पॅन्ट घातलेली आहे.

तसेच, साहिल सरोज अंगाने बारीक, रंग – गोरा, चेहरा – गोल, डोळे – काळे, डोक्याचे केस – काळे व बारीक, उंची – 2 फूट 5 इंच, नाक – सरळ, अंगात काळ्या रंगाचा टी -शर्ट व काळ्या रंगाची हाप पॅन्ट घातलेली आहे.

वरील वर्णनाची महिला व मुले कोणास आढळल्यास त्यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कापूरबावडी पोलीस ठाण्याचे(Kapurbawadi police station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर