
Thane: झाड कोसळ्यामुळे रस्त्यांवरची वाहतूक ठप्प !

समर प्रताप सिंग
ठाणे : सकाळी च्या सुमारास न्यू हारवर्ड इमारती (New Harvard building) समोरील रस्त्यावर एक भले मोठे झाड कोसळले आणि झाड कोसळ्यामुळे रस्त्यांवरची वाहतूक ठप्प झाली आहे. सोसायटीच्या रहिवाश्यानी प्रभाग क्र. 4 ब मा.नगरसेविका सौ. स्नेहा (ताई) आंब्रे व भाजपा ठाणे शहर (District) उपाध्यक्ष रमेश आंब्रे यांना फोन केला, त्यांनी तात्काळ ह्यांनी वृक्षाप्राधिकरण विभागास पाठपुरावा करीत त्वरित कार्यवाही करण्यात आली. टीएमसी च्या कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या साहाय्याने सर्व झाड कापणी करण्यात आली, अवघ्या 30 मिनिटांत ती जागा साफ करून घेतली. रस्त्यावरील वाहतूक सुरुळीत केली. उत्कृष्ट कामाबद्दल स्थानिक नागरिकांनी मा. नगरसेविका स्नेहाताईं आंब्रे ह्यांचे आभार मानले आहे.