
Thane : ठाणे रेल्वे स्टेशन येथील पोस्ट ऑफिस आता पूर्ण वेळ ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध

ठाणे : भारतीय डाक विभागाकडून ग्राहकांच्या सोयीसाठी ठाणे विभागातील ठाणे रेल्वे स्टेशन पोस्ट ऑफिस मध्ये सकाळी ८ ते रात्री ८ वाजे पर्यंत सेविंग बँक आणि बहुउद्देशीय सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. या वाढीव सेवेमुळे नोकरदार वर्गास खास लाभ होईल. तरी सर्व ग्राहकांनी आपण या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.