spot_img
HomeUncategorizedThane : 11 नोव्हेंबर रोजी दिव्यातील पाणीपुरवठा राहणार बंद

Thane : 11 नोव्हेंबर रोजी दिव्यातील पाणीपुरवठा राहणार बंद

Thane: On November 11, the water supply in Diwa will be closed

समर प्रताप सिंग
ठाणे : (Thane)
ठाणे महापालिकेच्या(Thane Municipal Corporation) अंतर्गत दिवा प्रभाग समितीअंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या मुख्य जलवाहिनीला सध्याच्या जलवाहिनीस जोडण्याचे काम अभियांत्रिकी पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. त्यामुळे शुक्रवारपासून(11 नोव्हेंबर रोजी) सकाळी ९ ते शनिवार सकाळी ९ वाजेपर्यंत सुमारे १२ तास महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ निळजे ते दिवा पूर्व, दिवा पश्चिम, साबे, दातिवली, म्हातर्डी, बेतवडे, आगासन(प्रभाग 27 व 28) दिवा परिसरातील नागरिकांनी या भागातील पाणीपुरवठा बंद राहील याची नोंद घ्यावी.

या बंदमुळे पाणीपुरवठा(water supply) पूर्ववत होईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, तरी नागरिकांनी पाण्याची योग्य साठवणूक करून ठाणे महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर