
Thane: नालेसफाईच्या कामांना सुरुवात

यंदा २५ दिवसाआधीच नालेसफाईची कामे केली सुरु
समर प्रताप सिंग
ठाणे : (thane) दरवर्षी ठाण्यात नालेसफाईच्या कामांना मे महिना अर्धा जात होता. मात्र, यंदा २५ एप्रिल म्हणजेच जवळ-जवळ २५ दिवसाआधीच नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली असून, आतापर्यंत ३२ टक्के कामे पूर्ण झाली असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यानुसार येत्या ७ जूनपर्यंत ही कामे पूर्ण केली जाणार असून, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा देखील या कामावर देखरेख ठेवून आहेत, असे ठाणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त(Additional Commissioner) संदीप माळवी माननी यांनी सांगितले.
दरवर्षी महापालिका हद्दीत नालेसफाईच्या कामांची ओरड केली जाते. निविदाप्रक्रिया अंतिम होत असताना त्याला प्रतिसाद न मिळाल्याने वारंवार मुदतवाढ दिली जाते, त्यामुळे प्रत्यक्ष स्वरुपात कामांनाही उशीर होत असतो. दरवर्षी नालेसफाईच्या कामांना ७ मेनंतर सुरुवात करण्याचा प्रयत्न पालिकेचा असतो. मात्र, ही तारीख अनेकवेळा चुकल्याचेही दिसून आले. यंदा मात्र पालिकेने २५ एप्रिलपासूनच नालेसफाईची कामे सुरु केली आहेत. दरदिवशी किती कामे झाली याची माहिती घेण्यासाठी प्रभाग समितीनिहाय सोशल मीडियावर ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या ग्रुपवर व्हिडिओ आणि फोटो रोजच्या रोज अपलोड होत असतात. तसेच प्रत्येक प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना देखील नालेसफाईच्या कामांवर देखरेख ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय ज्याठिकाणी जेसीबी जाणे शक्य नाही, त्याठिकाणी मनुष्यबळ(manpower) वापरून काम केले जात आहे. तर काही मोठ्या नाल्यांमध्ये दोन-दोन जेसीबी उतरुन कामे केली जात असल्याचे चित्र प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले आहे.

तर दुसरीकडे यंदा केवळ नालेसफाईवरच भर देण्यात आला नसून, गटार आणि कलव्र्हट सफाईची कामेदेखील याच दिवसापासून सुरु करण्यात आली आहेत. त्यानुसार गटारसफाईची कामे देखील जवळजवळ पूर्ण होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. महापालिका हद्दीत १२५ छोटे नाले असून, ५० हजार ४७१ एवढी या नाल्यांची लांबी आहे. नालेसफाईसाठी नऊ प्रभाग समिती अंतर्गत नऊ कामांसाठी निविदा मागविण्यात आल्या असून, त्यानुसार प्रत्येक ठिकाणी विविध संस्थांना ही कामे वाटून देण्यात आली आहेत. त्यानुसार वेळेत कामे पूर्ण करण्याचा यातून प्रयत्न असल्याचे महापालिकेचे(corporation) म्हणणे आहे. नालेसफाईच्या कामांसाठी प्रत्येक प्रभाग समितीनिहाय सोशल मीडियावर(social media) ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार २५ एप्रिलपासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली आहे. महिनाअखेरपर्यंत ही कामे १०० टक्के पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, असे ठाणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी माननी यांनी सांगितले.