
Thane: कोपरी गुरुनानक सोसायटी मीटर बॉक्स आग-9 मीटर जाळून खाक

ठाणे : (thane) ठाण्याच्या कोपरी परिसरातील (Gurunanak Society in Kopari area) गुरुनानक सोसायटीच्या मीटरला 5-13 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली आणि सोसायटीचे 9 मीटर जाळून खाक झाले. या घटनेत जीवितहानी झालेली नाही. आग पूर्णपणे विझविण्यात आली. कोपरी फायर स्टेशन जवळ, कोपरी, ठाणे (पू.) येथे गुरुनानक सोसायटीच्या डी विंग मधील तळ मजल्यावरती असलेल्या महावितरणच्या मीटर बॉक्सला आग लागली होती. सदर घटनास्थळी महावितरण विभागाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान 1- फायर वाहनाच्या मदतीने आग पूर्णपणे विझवीण्यात आली आहे. सदर घटनेत कोणलाही दुखापत नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. सदर घटनेत डी वींगचे नऊ मीटर पूर्णपणे जळाले आहेत.