spot_img
HomeUncategorizedThane : कोणत्या सर्वेक्षणात नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याच्या सूचना?

Thane : कोणत्या सर्वेक्षणात नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याच्या सूचना?

Thane: In which survey citizens are advised to participate in large numbers?

समर प्रताप सिंग
ठाणे : (Thane)
शहर नियोजनाचे धोरण ठरविताना त्यात नागरिकांचा सहभाग कसा वाढविता येईल, यासाठी एक मार्गदर्शक प्रणाली तयार करण्याचे काम केंद्र सरकार स्मार्टसिटी योजनेतंर्गत(Smart City scheme) करीत आहे. यासाठी देशातील सर्व 100 स्मार्टसिटी शहरांमध्ये ‘अर्बन आउटकम फ्रेमवर्क 2022’ या कार्यक्रमातंर्गत 9 नोव्हेंबर 2022 पासून ‘नागरिक आकलन सर्वेक्षण’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, यासाठी सर्व प्रभागसमिती स्तरावरुन जाहिरात, पथनाट्य आदीच्या माध्यमातून जनजागृती करण्याच्या सूचना ठाणे स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांनी सहाय्यक आयुक्तांना आज दिल्या.

नागरिक आकलन सर्वेक्षण 2022 या उपक्रमात नागरिकांना सहभागी करुन घेता यावे, यासाठी आज सर्व सहाय्यक आयुक्तांची नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर आज ठाणे स्मार्ट सिटी लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी महापालिकेच्या सर्व प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांची बैठक घेतली. नागरिकांना या अर्बन आऊटफ्रेमवर्क या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी करुन घेण्यात यावे, तसेच या उपक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचावी, यासाठी जनजागृती व्हावी, या दृष्टीकोनातून प्रभागसमितीनिहाय सार्वजनिक ठिकाणी बॅनर्स लावणे, वेगवेगळ्या विभागात पथनाट्य सादर करणे, स्थानिक लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांचा सहभाग घेणे, तसेच सदर उपक्रम जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावा, यासाठी वर्दळीच्या ठिकाणी उदा. मॉल्स, रेल्वेस्थानक परिसर, एस. टी. स्टॅण्डस, रिक्षा स्टॅण्डस(rickshaw stands) आदी ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या सूचनांनुसार, स्मार्ट सिटी मिशनच्या अंतर्गत समाविष्ट देशातील सर्व १०० स्मार्ट सिटी शहरांमध्ये अर्बन आउटकम फ्रेमवर्क २०२२ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरातील महानगरपालिका, राज्य शासन(State Government) केंद्र शासनाचे विविध कार्यालयांशी संबंधित एकूण ३७२ प्रकारचे मुद्द्यांवर आधारित माहिती केंद्र सरकारच्या एंपलीफाय पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि ठाणे स्मार्ट सिटी लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटी लि. कक्षाने शासनाचे दिलेल्या मुदतीत काम 100% पूर्ण केले आहे.

याच कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात केंद्रशासन शहरातील नागरिकांना सुध्दा समाविष्ट करून त्यांच्या प्रतिक्रिया ऑनलाईन पद्धतीने देता येतील. याबाबत शहरात विविध ठिकाणी विविध उपक्रम राबवून या कार्यक्रमाची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी स्मार्ट सिटी कक्षास केंद्र शासनाने आदेशित केले आहे.

नागरिकांना(citizens) आपली मते https://eol2022.org/ या बेवसाईटवर नोंदविता येतील यासाठी ठाणे शहरासाठी 802787 हा कोड वापरावा, असे आवाहन ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडच्यावतीने करण्यात आले आहे.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर