
Thane: ‘त्या’ मुलींसाठी मोफत संगणक प्रशिक्षण योजनेला उदंड प्रतिसाद

समर प्रताप सिंग
ठाणे : (thane) आमदार संजय केळकर यांनी शहरात गरीब-गरजू मुलींना संगणक प्रशिक्षण देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आणि पाहता-पाहता एक बॅच(batch) प्रशिक्षितही झाली आहे.
संगणकाचे प्रशिक्षण(computer training) घेऊन मुली त्यांच्या पायावर उभ्या राहाव्यात, त्यांची कुटुंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावीत या जाणिवेतून ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी मोफत संगणक प्रशिक्षण योजना सुरू केली. आतापर्यंत २१५ गरीब-गरजू मुलींना याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पुढील तीन महिन्यात आणखी २५० मुलींना याचा लाभ देण्यात येणार आहे. दरवर्षी सुमारे ५०० मुलींना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे संजय केळकर यांनी सांगितले.
संगणकाचे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या मुलींना प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम नुकताच संजय केळकर(Sanjay Kelkar) यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी त्यांनी मुलींशी सुसंवाद साधला. त्यांच्या चेहऱ्यावर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.
सध्या मनोरमानगर(Manoramanagar) येथे प्रशिक्षण केंद्र सुरू असून, लवकरच मानपाडा परिसरासह शहरात दहा ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. मोफत आणि प्रशिक्षित शिक्षकांकडून प्रशिक्षण दिले जात असून, या योजनेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. या प्रशिक्षणातून या मुलींना पुढील शिक्षणाची दिशा मिळावी, त्यातून रोजगार – स्वयंरोजगार निर्माण व्हावा, एक पिढी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी, हा उद्देश या योजनेमागे असून, तो सफल होताना दिसत असल्याची भावना संजय केळकर यांनी यावेळी व्यक्त केली.