
Thane : ठाण्यात पाऊस परागंदा पडझडही नगण्य

धरणे भरली, मात्र आता पावसाने दडी मारली
समर प्रताप सिंग
ठाणे : ठाण्यात मागच्या आठवड्यापासून पावसाने पाठ फिरविली असून, परागंडाचं झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे ज्या झाडांच्या पडझडीने अग्निशमन दल(fire brigade) आणि आपत्ती व्यवस्थापनाची दमछाक करून टाकली त्या पडझडीची संख्याही नगण्य झाल्याची नोंद ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून समोर येत आहे.
ठाण्यात(Thane) ९० मिमीच्या आसपास मुसळधार व चक्काजाम करणाऱ्या पावसाने ठाण्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे. २४ जुलैपासून सर्वाधिक पावसाची नोंद ही बुधवारी दिवसभरात ८.११ मिमी होती, तर पडझडीची केवळ एकाच घटना घडल्याचे दिसत आहे. ठाण्यात जुलै महिन्यात सर्वाधिक झाडे आणि झाडाच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटनांनी विक्रम प्रस्थापित केलेला आहे. तर दुसरीकडे मुसळधार पावसातही वाढ झाली होती. मात्र, २४ जुलैनंतर पावसाच्या नोंदीत घसरण होत गेली. काही मिनटे पाऊस पडून परागंदा झाल्याचे चित्र आहे. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने तानसा, भातसा अशी पाणीपुरवठा करणारी धरणे भरली, मात्र आता पावसाने दडी मारलेली आहे.
दिनांक पाऊस झाड पडले फांदी पडली
२४ जुलै ०७.८५ मिमी ०१ निरंक
२५ जुलै ०३. ८१ मिमी ०१ ०१
२६ जुलै ०२. ०३ मिमी निरंक निरंक
२७ जुलै ०८. ११ मिमी ०१ निरंक
२८ जुलै निरंक निरंक निरंक