spot_img
HomeUncategorizedThane : भूमिअभिलेख विभागातील भूकरमापक तथा लिपिक संवर्गाची 28 ते 31 नोव्हेंबर...

Thane : भूमिअभिलेख विभागातील भूकरमापक तथा लिपिक संवर्गाची 28 ते 31 नोव्हेंबर दरम्यान परीक्षा

समर प्रताप सिंग
ठाणे : भूमिअभिलेख विभागातील भूकरमापक तथा लिपिक(गट ‘क’ पदसमूह 4) संवर्गातील रिक्तपदे सरळसेवेने भरण्यासाठी दि. 28 नोव्हेंबर ते 31 नोव्हेंबर 2022 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा(online examination) राज्यातील विविध केंद्रांवर होणार असल्याची माहिती ठाण्याचे जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख यांनी कळविले आहे.

भूमिअभिलेख विभागातील भूकरमापक तथा लिपिक(Clerk) संवर्गातील पदे भरण्यासाठी दि. 09 डिसेंबर 2021 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार दि. 09 डिसेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत. त्यानंतर या अर्जदार यांना विभागाकडून दि. 28 फेब्रुवारी 2022 ते 13 मार्च 2022 या कालावधीत छाननी अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली होती.

छाननी अर्जप्रक्रियेमध्ये उमेदवार यांनी अपलोड केलेल्या(uploaded) सर्व प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येऊन भूमिअभिलेख विभागातील गट ‘क’ पदांच्या सेवाप्रवेश नियमांनुसार, जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हतेऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्र अपलोड केलेली आहेत, अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपूर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची सामान्य प्रशासन विभागाकडील दि. 04 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार, ऑनलाईन परीक्षा(संगणक आधारित परीक्षा) दि. 28 नोव्हेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबत विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर(https://mahabhumi.gov.in) लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पात्र उमेदवाराने संबंधित संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सुचनांनुसार, प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे व प्रवेशपत्रावर नमूद परीक्षा केंद्रावर उमेदवाराने दिलेल्या वेळेत उपस्थित राहून परीक्षा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहिती पुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच, परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरिताची लिंक देखील दि. 14 नोव्हेंबर 2022 पासून विभागाच्या उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे ठाण्याचे जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख यांनी कळविले आहे.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर