
Thane : कोकणासाठी स्पेशल ट्रेन्सची मागणी

गणेश उत्सवानिमित्त स्पेशल गाड्या 29 ऑगस्ट रोजी सोडण्यात याव्यात
समर प्रताप सिंग
ठाणे : (Thane) दिवा ते सावंतवाडी(Diva to Sawantwadi) विशेष गणपती स्पेशल गाड्या 29 ऑगस्ट रोजी सोडण्यात याव्यात, अशी मागणी ठाणे शहराचे भाजप आमदार संजय केळकर यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना केली आहे. याबाबत त्यांनी लेखी निवेदनही दिले आहे. गौरी-गणपती आणि गणेश उत्सवानिमित्त ठाणे जिल्ह्यात राहणारे नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या मूळगावी कोकणात जाणार आहेत. यावेळी गणपती उत्सव 31 ऑगस्ट रोजी येतोय.
संजय केळकर यांनी म्हटले की, कोरोनाच्या संकटामुळे कोकणवासीयांना(Konkan) दोन वर्षांपासून त्यांच्या मूळगावात कोणताही धार्मिक सण सार्वजनिकपणे साजरा करता आला नाही, पण आता परिस्थिती बदलली आहे. कोरोनाचा कहर कमी झालेला आहे. यासोबतच गणेशोत्सवाबाबतही शासनाकडून शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सव आणि गौरी-गणपतीसाठी कोकणवासीय पूर्ण उत्साहात मूळगावाला जाणार आहेत. गणेशोत्सवाबाबत(Ganeshotsav) कोकणवासीयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे, तर गणेशोत्सवानिमित्त जाणाऱ्या गाड्यांची तिकिटे ४ महिन्यांपूर्वीच संपली आहेत. या स्थितीत कष्टकरी लोकांचे हाल होत आहेत. त्यामुळे विशेष गाड्या सोडल्यास कष्टकरी कुटुंबांना पुरेसा दिलासा मिळेल.