
Thane: ‘त्या’ प्रकरणात ३०० हून अधिक जणांविरोधात कारवाई

समर प्रताप सिंग
ठाणे : (thane) मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण करण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना दिल्यानंतर बुधवारी पहाटेपासून ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील सर्व मशिदींसमोर पोलीस तैनात करण्यात आले होते. तर पोलिसांनी कलम १४९ कायद्यांतर्गत, तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार अनेक मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना नोटीस बजावली होती. ठाणे पोलिसांकडून दुपारपर्यंत आयुक्तालय क्षेत्रातील ३०० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले.

मशिदींच्या विश्वस्तांना पहाटेच्यावेळी भोंग्याचा वापर करून नमाज पठण करू नये, असे आवाहन पोलिसांनी(Police) केल्याने पहाटे काही मशिदींमध्ये भोंग्याचा वापर करणे टाळण्यात आले, परंतु दुपारच्या वेळेत काही मशिदींवर भोंग्याद्वारे नमाज पठण करण्यात आले. त्याच्या आवाजाची पातळी अत्यंत कमी होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस आयुक्तालय क्षेत्रात शांतता आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याचे कोणतेही प्रकार समोर आलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले. तर 300 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आणि संध्याकाळी न्यायालयीन जामिनावर(court bail) त्यांची सुटका करण्यात आली.