spot_img
Homebusiness-mrThane : आधारभूत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात 5 खरेदी केंद्रे

Thane : आधारभूत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यात 5 खरेदी केंद्रे

समर प्रताप सिंग
ठाणे : शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजना हंगाम 2022-23 अंतर्गत धान खरेदीसाठी चालू हंगामात 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करण्यास राज्य शासनाने मुदतवाढ दिली आहे. तसेच, ठाणे(Thane) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाच संस्थांमार्फत धान खरेदी सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह खरेदी केंद्रावर भात विक्रीसाठी आणावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.

शासनाने चालू हंगामाकरिता दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ दिली असून, नोंदणीकृत शेतकऱ्यांची धान खरेदी दि. 19 ऑक्टोबर 2022 पासून ते 31 जानेवारी 2023 पर्यंत या कालावधीत करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी(farmers) खरेदी केंद्रावर धान विक्रीवेळेस त्यांच्याकडील चालू हंगाम 2022-23 ची ई-पिक पाहणी केलेला(भाताची) नोंद असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक इत्यादी कागदपत्र घेऊन जिल्ह्यातील नमूद खरेदी केंद्रावर भात विक्रीसाठी आणावा, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर