
Solapur: मोदी सत्तेत आल्यापासून समस्या वाढल्या : प्रणिती शिंदे

Indiagroundreport वार्ताहर
सोलापूर : देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आल्यापासून अनेक उद्योग, व्यवसाय, सरकारी संस्था बंद पडल्या आहेत. गरिबांना रोजगार मिळत नाही, महागाई वाढली आहे, अशी टीका काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे(MLA Praniti Shinde) यांनी केली आहे.
ताई, माई अक्का, विचार करा पक्का अन् हातावर मारा शिक्का, असे म्हणत त्यांनी निवडणुकीत शिक्काच असायला हवा, मोदी सरकारने(Modi government) बटणामुळे सगळे बिघडून टाकले आहे, असा आरोप करीत त्यांनी मतदान यंत्रांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित केला आहे.
महापालिकेत काँग्रेसची सत्ता असताना एक दिवसानंतर नियमित पाणीपुरवठा करण्यात येत होता. महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून पाच दिवसानंतरही पुरेसे पाणी मिळत नाही. काँग्रेसला मतदारांनी सत्ता दिल्यास शहराला नियमित, शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा(water supply) करण्यात येईल, असे आश्वासन आमदार शिंदे यांनी येथील मतदारांना दिले.