
Sindhudurg : 21 जूनपासून कणकवलीत राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा

350 ते 400 खेळाडू होणार सहभागी
Indiagroundreport वार्ताहर
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनची संलग्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बॉक्सिंग संघटनेच्यावतीने कणकवलीत(Kankavali) राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २२ ते २८ जून या कालावधीत कणकवलीत चौंडेश्वरी मैदानात होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बॉक्सिंग संघटनेच्यावतीने प्रत्येक तालुक्यात नवीन शाखा सुरू करून शालेय विद्यार्थ्यांना बॉक्सिंगचे प्रशिक्षणही दिले जाणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बॉक्सिंग संघटनेचे सचिव डॉ. राजाराम दळवी यांनी दिली.
डॉ. राजाराम दळवी(Dr. Rajaram Dalvi) म्हणाले की, या स्पर्धेचे उद्घाटन 22 जून रोजी सकाळी 12 वा. आ. नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून, यावेळी कोकण विभागीय शिक्षक मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी जि.प. अध्यक्ष संजना सावंत व अन्य उपस्थित राहणार आहेत.