
Ratnagiri : आता सर्व मेल, एक्स्प्रेस गाड्यांचे मिळणार जनरल तिकीट

Indiagroundreport वार्ताहर
रत्नागिरी : आता सर्व मेल, एक्स्प्रेस(express) रेल्वेगाड्यांचे जनरल तिकीट मिळणार आहे. येत्या २९ जूनपासून ही सुविधा कोरोनाकाळानंतर पुन्हा उपलब्ध होणार आहे.
रिझर्व्हेशनशिवाय(reservation) ऐनवेळी तिकीट काढून प्रवास करण्याची सुविधा कोरोनाकाळात पूर्णपणे बंद करण्यात आली होती. आता ती सुरू करण्यात आली आहे. हा प्रवाशांसाठी मोठा दिलासा आहे. येत्या २९ जूनपासून हा निर्णय लागू होणार आहे.
रेल्वेच्या सर्व मेल(Mail), एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांचे जनरल तिकीट आता सर्वत्र मिळणार आहे. यापूर्वी फक्त ठराविक गाड्यांचे जनरल तिकीट मिळत होते. आता रेल्वेच्या एटीव्हीएम, जीटीबीएस, अनारक्षित तिकीट काऊंटर, तसेच यूटीएस मोबाईल ॲपद्वारे जनरल तिकीट मिळणार आहे. त्यामुळे आता वेटिंग लिस्ट असलेल्या आणि ऐनवेळी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.