
Pune: कशामुळे फुलांच्या किमतीत वाढ?

Indiagroundreport वार्ताहर
पुणे : (pune) वाढत्या तापमानामुळे फुले(flowers) खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या फुलांच्या किमतीत वाढ झाली आहे. दहा रुपयांना मिळणारा हार आता 20 रुपयांना मिळू लागला आहे.
पेट्रोल-डिझेलच्या(petrol-diesel) वाढत्या किमतीमुळे वाहतूक महागली असून, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. ग्रामीण भागातून फुले पिंपरी चिंचवड शहरात येण्यासाठी जास्त खर्च होत आहे, त्यामुळे फुलांच्या किमतीत वाढ झाली आहे.

वाढत्या उन्हामुळे सकाळी बनविलेला हार दुपारपर्यंत कोमेजून जात आहे. यामुळे हारांच्या किमती वाढले असल्याचे दुकानदारांनी सांगितले. दुकानदारांना(Shopkeepers) हार बनविण्यापेक्षा लग्नसराईच्या ऑर्डरमध्ये दोन पैसे अधिक मिळतात, त्यामुळे हार विकण्यापेक्षा लग्नाच्या ऑर्डर्स, फुलांचे बुके बनविण्यात जास्त रस असल्याचे दिसून येत आहे.