spot_img
HomeUncategorizedPune : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावली

Pune : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावली

Pune: Veteran actor Vikram Gokhale's health deteriorated

पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु
Indiagroundreport वार्ताहर
पुणे : (Pune)
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले(Vikram Gokhale) यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. सध्या ते पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कुटुंबियांनाही याबाबत डॉक्टरांनी माहिती दिलेली आहे.

विक्रम गोखले यांनी टीव्ही सीरियल, बॉलिवूड(Bollywood), मराठी सिनेमांत अनेक भूमिका गाजविल्या आहेत. अभिनेते म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. सिनेमांमध्ये मिळेल त्या भूमिकेला योग्य न्याय त्यांनी आजवर दिला आहे. त्यांचा मोठा चाहता वर्गही आहे, मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय-संन्यास घेतला आहे.

विक्रम गोखले यांना 2013 साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानेही(Shantaram Lifetime Achievement Award) त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर