
Pune : मंत्रिमंडळाचा विस्तार होणार लवकरच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Indiagroundreport वार्ताहर
पुणे : (Pune) मंत्रिमंडळाचा(the cabinet) विस्तार लवकरच होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. पुणे दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पीककर्ज, धरणातील पाणी, कोरोना प्रादुर्भावाची सद्यस्थिती आणि बूस्टर डोस याबाबत आढावा घेतला. या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षांकडून उपस्थित करण्यात येत असलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी राज्यातील सरकार संवेदनशून्य असल्याची टीका केली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पूरपरिस्थितीमध्ये मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीचा दौरा केला. हेलिकॉप्टरही तयार ठेवले होते. त्याचा वापर करून जाणार होतो, मात्र पाऊस एवढा होता की हेलिकॉप्टर जाऊ शकत नव्हते. तरी आम्ही पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे. रस्त्याने जाऊन त्या परिस्थितीचा आढावा घेतला.
राज्य सरकारच्या कामाविषयी माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी सरकार चांगल्या प्रकारे चालले आहे की नाही?, असा सवाल विरोधकांना विचारला आहे.
शेतकऱ्यांना ५० हजार रुपये देण्याची योजना थांबली होती. ती आम्ही कार्यान्वित केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या, असेही ते यावेळी म्हणाले.