spot_img
HomeUncategorizedPimpri Chinchwad : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा : सुप्रिया सुळे

Pimpri Chinchwad : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा : सुप्रिया सुळे

Pimpri Chinchwad: Impose President's Rule in the state: Supriya Sule

Indiagroundreport वार्ताहर
पिंपरी चिंचवड :(Pimpri Chinchwad)
राज्यातील वातावरण अस्थिर झाले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. सरकारमध्ये एकमत नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट हा एक पर्याय असू शकतो किंवा निवडणुका घेणे हा चांगला पर्याय असू शकतो, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड(Jitendra Aawhad) यांच्या प्रकरणावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, जितेंद्र आव्हाड याचे विधानसभेतील काम चांगले आहे. त्यांनी राजीनामा देऊ नये, पक्ष त्यांच्या नेहमी पाठिशी आहे.

मुख्यमंत्र्यांसमोर आणि बंदोबस्तात असलेल्या इतर पोलिसांसमोर(policemen) जितेंद्र आव्हाड यांनी त्या महिलेला येथे गर्दीत कशाला आली, असे म्हणत हाताने बाजूला सारले. हा काही विनयभंग आहे का? आव्हाड यांच्या विरोधात खोटा आणि चुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे, असे मत सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केले.

संजय राठोड प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हायला हवी. संजय राठोड प्रकरण(Sanjay Rathod case) खूप नाजूक आहे. मी पूर्वीपण म्हणत होते की, जर त्या मुलीवर अन्याय झाला असेल, तर त्याची पारदर्शक चौकशी करण्यात यावी. संजय राठोडांवर पूर्वीपण आरोप केले नव्हते. आता विरोधक असूनही आरोप करणार नाही, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर