
New Delhi : शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या याचिकांवर आता 3 ऑगस्ट रोजी होणार सुनावणी

Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : (New Delhi) महाराष्ट्रात घडलेल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court) उद्या(१ ऑगस्ट) होणारी सुनावणी आता बुधवार, ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. या सुनावणीकडे राज्यासह साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.
‘तो’ वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला
शिवसेना नेते एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यात अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडल्या. यातून मूळ शिवसेना विरुद्ध शिंदे गट असे दोन गट आमने-सामने उभे ठाकले. त्यात दोन्ही गटांनी शिवसेना आमचीच असा दावा केला, त्यामुळे पक्ष आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह यावरील दाव्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यावरून पुढे हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. त्याआधीच्या या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई, विधानसभा अध्यक्ष, विधिमंडळ नेते आणि प्रतोद निवड, राज्यपालांनी शिंदे-फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी दिलेली अनुमती, निवडणूक आयोगाच्या नोटिसीला स्थगिती आदी विषयांवर दोन्ही गटांनी परस्परांविरोधात केलेल्या याचिका प्रलंबित आहेत. या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या त्रिसदस्यीय पीठासमोर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार होती, मात्र आता ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.