
New Delhi : नानी आणि साई पल्लवी यांचा चित्रपट ‘श्याम सिंहा रॉय’ नेटफ्लिक्सवर प्रदर्शित

Indiagroundreport वार्ताहर:
हैदराबाद (National News) [India]: (New Delhi) स्टार नानी आणि अभिनेत्री साई पल्लवी यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘श्याम सिंहा रॉय’(‘Shyam Sinha Roy’) हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. श्याम सिंहा रॉय नेटफ्लिक्सवर(Netflix) तमिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगू भाषेत इंग्रजी सह-शीर्षकांसह उपलब्ध आहे.
या चित्रपटात नानी, साई पल्लवी यांच्यासह कृती शेट्टी, मॅडोना सेबॅस्टियन, मुरली शर्मा, अभिनव गोमातम आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल संकीरत्यन यांनी केले असून, संगीत मिकी जे. मेयर यांनी दिले आहे. पश्चिम बंगालच्या देवदासी(Devdasi) या ज्वलंत सामाजिक विषयावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटास सामाजिक माध्यमांवर जोरदार प्रतिसाद मिळतो आहे. चित्रपटाची निर्मिती निहारिका एंटरटेनमेंट प्रोडक्शनने केली आहे. यापूर्वी नानी-साई पल्लवी यांनी ‘एमसीए’ (‘MCA’)या चित्रपटात सोबत काम केले आहे.