
New Delhi : लालूप्रसाद यादव यांना सिंगापूरसाठी पासपोर्टच्या नूतनीकरणाची परवानगी

सीबीआय कोर्टाने दिला मोठा दिलासा
Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : सीबीआय कोर्टाने(The CBI court) राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना सिंगापूरला जाण्यासाठी पासपोर्टच्या नूतनीकरण करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे आता लालूप्रसाद यादव त्यांच्या पुढील उपचारासाठी सिंगापूरला(Singapore) जाऊ शकतात. सीबीआय कोर्टाचे विशेष न्यायाधीश महेश कुमार यांनी ही परवानगी दिली आहे. यासंदर्भात लालू प्रसाद यादव यांचे वकील सुधीर कुमार सिन्हा यांनी अर्ज दाखल केला होता.
याअगोदर १४ जून रोजी लालू प्रसाद यादव(Lalu Prasad Yadav) यांना रांचीच्या सीबीआय कोर्टाने बाहेरील देशात जाण्याची परवानगी दिली होती. लालू प्रसाद यादव गेल्या वर्षापासून सिंगापूरच्या डॉक्टरांच्या संपर्कात आहेत.
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये यासंदर्भात चर्चा झाली होती. लालू प्रसाद यादव यांच्या किडनीची सर्जरी होणार असल्याचे बोलले जात आहे. लालू प्रसाद यादवांना अनेक आजारांनी ग्रासले आहे, ज्यामध्ये त्यांना सर्वात मोठी समस्या टाईप-२ मधुमेह आणि रक्तदाब आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या दोन्ही वरिष्ठ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार लालू प्रसाद यांना १५ आजार आहेत. त्यातील सर्वात मोठी चिंता म्हणजे त्यांचा अनियंत्रित मधुमेह जो पूर्णपणे इन्सुलिनवर अवलंबून आहे. ते सद्या त्यांची मुलगी मीसा भारती(Misa Bharti) यांच्या दिल्लीतील घरी राहत आहेत.
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यांना विशेष सीबीआय न्यायालयाने पाच वेगवेगळ्या चारा घोटाळ्यात शिक्षा सुनावली आहे. अर्धी शिक्षा पूर्ण होऊन ते प्रकृतीचे कारण आणि त्यांचे वाढते वय लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने या सर्व प्रकरणात जामीन मंजूर केला होता. लालू प्रसाद आता जामिनावर(bail) बाहेर आहेत.