
New Delhi : राज्यसभेतील १९ खासदारांना केले निलंबित

Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : राज्यसभेत(Rajya Sabha) विरोधी पक्षांच्या सदस्यांकडून जोरदार गदारोळ करण्यात आला. त्यानंतर एकूण १९ खासदारांना सभागृहातून एका आठवड्यासाठी निलंबित करण्यात आले. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी ही कारवाई केली.
खासदारांनी(The MPs) सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे राज्यसभेचे कामकाज रोखण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी उपसभापतींनी एका आठवड्यासाठी संबंधित खासदारांना निलंबित करण्याचे आदेश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, निलंबित केलेल्या खासदारांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या (Congress) सुष्मिता देव, डॉ. शांतनु सेन आणि डोला सेन यांच्यासह इतर राज्यसभा खासदारांचा समावेश आहे. या खासदारांनी सभागृहातील वेलमध्ये प्रवेश करून घोषणाबाजी केली, त्यामुळे या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.