
Navi Mumbai: टेम्पोसह लाखोंचा गुटखा जप्त

ज्योती दुबे
नवी मुंबई : (navi mumbai) पनवेल तालुका(Panvel taluka) पोलिसांच्या पथकाने शनिवारी तालुक्यातील सोमटणे रेल्वे क्रॉसिंगजवळ एका टेम्पोमध्ये ठेवलेला 5 लाख 16 हजार 650 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर(Ravindra Daundkar) यांना माहिती मिळाली की, दोन व्यक्ती एका टेम्पोमध्ये बेकायदेशीररित्या प्रतिबंधित खाद्यपदार्थांची साठवणूक करीत असून, ते आरोग्यास हानिकारक व मानवी जीव धोक्यात घालत आहेत. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंकुश खेडकर, एपीआय विवेक भोईर, एपीआय धनश्री पवार, पोलीस नाईक गणेश सांबरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकून टेम्पो जप्त करून ५ लाख 16 हजार 650 रुपयांचा गुटखा जप्त केला. आरोपींवर गुन्हा दाखल करीत ताब्यात घेण्यात आले आहे.