spot_img
Homebusiness-mrNavi Mumbai : एपीएमसी मार्केटमध्ये आफ्रिकन हापूस दाखल

Navi Mumbai : एपीएमसी मार्केटमध्ये आफ्रिकन हापूस दाखल

पुरुषोत्तम कनौजिया
नवी मुंबई : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर शनिवारी आफ्रिकन हापूस(African Hapoos) नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाला. त्याची खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. आफ्रिकेतील मालविका नावाच्या देशातून गेल्या पाच वर्षांपासून हा हापूस भारतातील बाजारपेठेत विकला जात आहे.

या आंब्याची चव, रंग आणि सुगंध जवळजवळ भारतीय हापूस सारखच आहे. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमधील(APMC market) व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले की, सुमारे 12 वर्षांपूर्वी आफ्रिकेतील एका शेतकऱ्याने महाराष्ट्रातून रोप नेले होते, त्यानंतर आता जवळपास साडेचारशे एकर जागेत हापूस आंब्याची लागवड केली जात आहे. कारण, महाराष्ट्रातील कोकणात ज्या प्रकारची माती आढळते त्याचप्रकारची माती तेथेही उपलब्ध आहे. तिथले वातावरण आणि हवामान जवळपास कोकणासारखेच आहे.

महाराष्ट्रातील कोकणात(Konkan) जन्माला येणारा हापूस जगभर प्रसिद्ध आहे. त्यामुळे तेथील सरकारने हापूसची लागवड त्यांच्या देशात करण्याचा विचार केला होता, ज्याअंतर्गत हापूसचे कलम भारतातून नेण्यात आले होते. एका पेटीत 9 ते 18 आंबे असतात. सर्वात लहान बॉक्सची किंमत सुमारे 3 हजार 700 रुपये आहे. मात्र, यंदा आफ्रिकन आंबा(mango) काही विलंबाने बाजारात पोहोचला आहे. मागील वर्षामध्ये ते ऑक्टोबर महिन्यात पोहचले होते, त्यामुळे ते सुमारे 1 महिन्याच्या विलंबाने नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये पोहोचले आहेत.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर