
Nashik : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग 15 व 16 जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर

Indiagroundreport वार्ताहर
नाशिक : (Nashik) महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग 15 व 16 जुलै 2022 रोजी नाशिक जिल्हा(Nashik district) दौऱ्यावर येत आहे, असे जिल्हाधिकारी नाशिक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग उपसमितीची येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या(District Collector’s Office) सभागृहात 15 जुलै व 16 जुलै 2022 रोजी जनसुनावणी होणार आहे. या सुनावणीस आयोगाचे सन्माननीय सदस्य उपस्थित रहाणार असल्याचेही जिल्हाधिकारी नाशिक कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.