
Nagpur : नागपूर येथे मान्यवरांनी केले ‘त्यांचे’ स्वागत

Indiagroundreport वार्ताहर
नागपूर : आयआयएम नागपूरच्या स्थायी प्रांगणाचे उद्घाटन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे रविवारी सकाळी नागपुरात(Nagpur) आगमन झाले.
यावेळी महाराष्ट्र राज्यपाल(Governor) भगतसिंह कोश्यारी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी, तसेच अन्य मान्यवरांनी त्यांचे विमानतळावर स्वागत आणि अभिवादन केले.
आयआयएम नागपूरचे स्थायी भवन नागपूरच्या मिहान, दहेगाव मौजा येथे बांधण्यात आले आहे.
राष्ट्रपती सचिवालयाने ट्वीटरद्वारे ही माहिती दिली.
