
Mumbai : कोणी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ?

प्रशांत बारसिंग
मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव(Jayashree Chandrakant Jadhav) या निवडून आल्या असून, त्यांचा शपथविधी सोहळा विधानभवन येथे आज झाला. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ(Narhari Jhirwal) यांनी जयश्री जाधव यांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली.

मान्यवरांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार नाना पटोले, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.