spot_img
HomeUncategorizedMumbai : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोण झाले आक्रमक?

Mumbai : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोण झाले आक्रमक?

Mumbai: Who became aggressive on farmers' questions?

रवीकांत तुपकर मंत्रालयाशेजारील समुद्रात करणार जलसमाधी आंदोलन
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai)
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. अतिवृष्टीतील नुकसानभरपाई दिली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रवीकांत तुपकर(RaviKant Tupkar) हे शेतकऱ्यांना घेऊन मंत्रालयाशेजारील समुद्रात जलसमाधी आंदोलन करणार असून, जालन्याहून मुंबईला रवाना झाले आहेत.

राज्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र, सरकारने शेतकाऱ्यांना(Farmers) कोणतीही मदत केली नाही, असा आरोप शेतकरी नेते रवीकांत तुपकर यांनी केला आहे.

त्याचबरोबर सोयाबीन आणि कापसाला भाव नाही. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना रात्रीची नव्हे, तर दिवसाची लाईट पाहिजे, अशा अनेक मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना एक महिन्यांपासून आंदोलन करीत आहे. मात्र, सरकार याची कोणतीही दखल घेत नाही, असा आरोप देखील रवीकांत तुपकर यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे रवीकांत तुपकर हे शेतकऱ्यांना घेऊन मुंबईमधील अरबी समुद्रात(Arabian Sea) जल आंदोलन करणार आहे.

जालना(Jalna) जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना घेऊन रवीकांत तुपकर हे मुंबईसाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, आंदोलनापूर्वी रवीकांत तुपकर यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पोलिसांनी बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, ‘आपण दिलेल्या सामूहिक जलसमाधी इशाऱ्यामुळे कोणताही दखलपात्र अथवा अदखलपात्र गुन्हा होवून ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास अथवा उच्च न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन होईल. तसेच शासनाच्या वरील नमूद परिपत्रकातील अटी व शर्तीचा भंग झाल्यास, त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील व आपणाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी रवीकांत तुपकर यांना दिला आहे.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर